loader
Breaking News
Breaking News
Foto

टाइम्स डीजिटल बातमीची दखल : कोंडअसुर्डे जांभूळवाडी रस्त्यावरील फलकावर अखेर 'NH 66' चा अचूक उल्लेख; 'शिव धामापूर' नावाचाही समावेश

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे नंबर बदलून वर्षे उलटल्यानंतरही संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे जांभूळवाडी रस्त्यावरील नवीन दिशादर्शक फलकावर चक्क जुनाच 'NH 17' असा उल्लेख केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि भोंगळ कारभारावर प्रकाश टाकणारे वृत्त रात्नागीर्री टाइम्स डीजिटल मधून प्रसिद्ध होताच, खडबडून जागे झालेल्या सबंधित बांधकाम विभागाने आणि संबंधित यंत्रणेने अवघ्या काही दिवसातच आपली चूक सुधारली आहे. या फलकावरील जुना क्रमांक बदलून आता तिथे अधिकृत 'NH 66' अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडअसुर्डे जांभूळवाडी ग्रामीण रस्त्यावरून मुख्य महामार्गाकडे जाणाऱ्या चालकांच्या आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने पैसे खर्च करून नवा कोरा दिशादर्शक फलक लावला होता. मात्र, त्यावर जुनाच 'NH 17' लिहिल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या बेजबाबदारपणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने चक्रे फिरली. आणि संबंधितांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत फलकावरील तो चुकीचा उल्लेख खोडून काढला.प्रशासनाने केवळ महामार्गाच्या क्रमांकातच सुधारणा केली नाही, तर फलकावरील आणखी एका उल्लेखात महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वीच्या फलकावर मागे जाणाऱ्या दिशेला 'पिर धामापूर' असा उल्लेख करण्यात आला होता. प्रशासनाने आता त्यामध्ये बदल करून 'शिव धामापूर (पिर)' अशी दुरुस्ती केली आहे. तसेच महामार्गाचा मार्ग दाखवणाऱ्या बाणासमोर 'NH 66' असे अचूक स्पष्ट दिसेल अशी दुरुस्ती केली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स डीजिटल ​वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. डिजिटल मॅप्स आणि शासकीय दप्तरी नोंद असलेला अचूक मार्ग आता फलकावर आल्यामुळे नवीन वाहनचालकांचा संभ्रम दूर होणार आहे. मात्र, भविष्यात असे फलक लावताना किंवा मंजूर करताना अधिकाऱ्यांनी आधीच काळजी घ्यावी, जेणेकरून शासकीय निधीचा अपव्यय टळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg