loader
Breaking News
Breaking News
Foto

पोल्ट्रीत पुराचं पाणी शिरल्यानं तीन हजाराहून अधिक पक्षी मृत्युमुखी; शेतकर्‍याचं मोठं आर्थिक नुकसान

रोहा - रोहा तालुक्यातील किल्ला येथील युवा शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक दिलीप कडव यांनी बारटक्के वाडा नजीकच्या शेतात नोकरी व्यवसाय सोबत पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक शेड उभारून कोंबडी पालन करत असताना त्यांनी नुकतेच तीन हजाराहून अधिक बॉयलर कोंबडीचे पक्षी आणून त्यांचे पालन करत होते परंतु मागील चार दिवस पावसाचा जोर कायम राहिला आणि अचानक कुंडलिका नदीने आपली धोक्याची पातळी सतत गेली तीन ओलांडल्याने रविवारी 5 जुलैच्या मध्यरात्री अचानक खुप मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्याने शेडमधील सर्व पक्षी (पिल्ले) मृत्युमुखी झाल्याची घटना घडली असून युवा शेतकरी कडव यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्याचा शिक्षित युवा तरुण नोकरीकडे न वळता तो आपल्या पारंपरिक शेतीकडे अधिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व्यवसाय करता असतानाच शेतीला जोड व्यवसाय कसा करता येईल? याकडे लक्ष केंद्रित करत असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या फळ बागा, भाजी पाला, पशु पालन, कुकुट पालन, शेळी पालन तसेच पोल्ट्री उद्योग व्यवसाय त्याच बरोबर कृषी क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगले शेती प्रयोग आणि व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत असतात. याच भावनेतून किल्ला येथील युवा शेतकरी दिलीप कडव यांनी नवदित पोल्ट्री व्यवसाय सुरू करत त्यांनी त्या व्यवसायासाठी आपली पदरमोड करून जवळपास तीन हजाराहून अधिक बॉयलर कोंबडीचे पिले आणली होती.

टाईम्स स्पेशल

त्यांचे पालन पोषण सुरू असतानाचा निसर्गाने काळाचा घाला घातला आणि अचानक आपल्या पुराचे पाणी त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये शिरल्याने सारी पिल्ले मृत्यूमुखी पडली. तसेच त्यांचे खाद्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी कडव हे मोठे आर्थिक संकटात सापडले असून असून ते चिंताग्रस्त झाले आहे. सदरील खात्याने याची दखल घेऊन या नुकसानीचे पंचनामे करून त्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg