loader
Breaking News
Breaking News
Foto

स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरच म्हाप्रळ-आंबेत पुलावरून वाहतूक

संगलट (खेड), (वार्ताहर) : म्हाप्रळ-आंबेत पुलाचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्याबाबतचा अहवाल आल्यावर या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. ४ दिवसांपूर्वी वाळूने भरलेले दोन बार्ज या पुलाला धडकले होते. त्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्यावतीने बुधवार दि. ८ जुलै रोजी क्षतीग्रस्त म्हाप्रळ आंबेत पुलाची तपासणी करण्यात आली. विपरीत हवामान व पाण्याचा विरुद्ध प्रवाह यामुळे पुलाचे क्षतीग्रस्त झालेल्या खांबाची केवळ वरुन दृष्य पाहणी करण्यात आलेली असल्याची माहिती महाड येथील विभागाचे जे.ई ओंकार शिरगांवकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पुलाचे खांबाना हजार टनाहून अधिक वजनाचे बार्जनी धडक दिल्याने खांब काही प्रमाणात क्षतीग्रस्त झाल्याचे प्रथम दर्शनी वरुन दिसत आहे. तसा अहवाल संबंधित यंत्रणांना पाठवून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशा सूचना सर्व संबंधितांना पत्र देऊन दिलेल्या असल्याचे शिरगांवकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाऊस शांत होऊन हवामान पूर्वपदावर आल्यावर क्षतीग्रस्त खांबांची पाण्याचे खाली काय परिस्थिती आहे याचे स्ट्रक्चरल ऑडीट पुढील दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यानंतरच पुलावरील वाहतूक सुरु होण्यासंदर्भातील निर्णय होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या भूमिकेस तहसीलदार मंडणगड यांच्याकडून दुजोरा मिळाला असून महसूल प्रशासन पोलिसांचे मदतीने बांधकाम विभागाचे सुचनांचे पालन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पुलावरुन पैसे घेऊन छोटी वाहने चोरट्या पध्दतीने सोडण्याच्या समाजमाध्यमातील चर्चाबाबत तहसीलदार मंडणगड यांना विचारणा केली असता पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे, असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरोधात रितसर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg