दापोली (प्रतिनिधी) : शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही विविध कौशल्याधारित आणि अनुभवात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. असे प्रतिपादन शाळेचे मुख्याधापक गोरिवले यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण (NEP2020) अंतर्गत विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळावे तसेच आपल्या कृषी प्रधान देशामध्ये शेतीचे महत्व व श्रमसंस्कार रुजावेत या उद्देशाने एम् के. इंग्लिश स्कूल आंजर्ले शाळेच्या विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष भात शेतीत उतरून शेती कामाचा अनुभव घेतला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दापोली मंडल अधिकारी कदम, आंजर्ले कृषी अधिकारी कुंवर, आंजर्ले येथील शेतकरी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. मंडल अधिकारी कदम यांनी मार्गदर्शन करतांना भाताची चतुःसूत्रीची माहिती दिली व आपल्या आईजवळ जशी नाळ जुळते तशीच नाळ या भूमातेजवळ प्रत्येकाने जुळवली तरच भविष्य उज्वल असेल असे ते मार्गदर्शन करताना म्हणाले. तर आंजर्ले कृषी अधिकारी कुंवर यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष भात लावणीत सहभाग घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शेताची पाहणी, भातलावण्याची पद्धत, चिखलात उतरून भात लावणी करणे, पाणी व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन कष्टाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. अन्नधान्याच्या प्रत्येक दाण्यामागील शेतकऱ्यांचे कष्ट समजल्याने विद्यार्थांमध्ये शेतीविषयी आदर आणि श्रम प्रतिष्ठेची भावना अधिक द्रुढ झाली.
या उपक्रमात शाळेतील शिक्षक, पालक ग्रामस्थ सहभागी होऊन या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून जीवनोपयोगी शिक्षण मिळत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या उपक्रमासाठी आंजर्लेचे ग्रामस्थ विश्वास महाडीक यांनी कोणताही मोबदला न घेता पॉवर टिलर उपलब्ध करून दिला. अल्केश कांबळे यांनी विना मोबदला गाडी उपलब्ध केली. या उपक्रमाला संदीप पेंडसे, गणेश राऊत, दिलीप घाणेकर, डॉ. वैभव लिमये, शशि लिमये, किरण हंबीर, संदीप राऊत यांनी बहुमोल सहकार्य केले. या उपक्रमाला शाळेतील जेष्ठ शिक्षिका बेडेकर, पवार, कोंडविलकर, झाडेकर, पेंडसे या सर्वाचें सहकार्य लाभले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.