लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा महामार्गावरील तालुक्यातील वाकेड येथील लक्ष्मीबाग नजीकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या केबिनवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका ५० ते ५५ वर्षीय वेडसर अनोळखी व्यक्तीचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसात तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वेडसर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पावसाची संततधार सुरूच असल्याने या पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना शनिवारी ४ जुलै रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील वाकेड लक्ष्मीबाग येथे घडली. याठिकाणी सुरू असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या कामाच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असलेल्या डोंगरातील दगड मातीयुक्त दरड अचानक या पेट्रोल पंपाच्या आवारातील एका केबिनवर कोसळली आणि क्षणार्धात ही केबिन मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
सुदैवाने या दुर्घटनेत याठिकाणी कामाला असणारे जेद अतिकुल त्यागी (१८ वर्षे, रा. उत्तरप्रदेश), सुवेल अयुब त्यागी (१९ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) व महंमद समीन साहवेज (२२ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) हे तीन परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले आहेत. मात्र या दुर्घटनेत एका वेडसर अनोळखी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अनोळखी वेडसर व्यक्ती शनिवारी ४ जुलै रोजीच पावसामुळे याठिकाणी भिजलेल्या अवस्थेत पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये आश्रयाला आली होती. मात्र दुर्दैवाने तिचा या दुर्घटनेत हकनाक बळी गेला आहे. ही व्यक्ती केबिनमध्ये अंगावरील भिजलेले कपडे काढून बसलेली होती असतानाच अचानक दरड कोसळल्याने दगडयुक्त मातीचा मोठा ढिगारा या केबिनवर आला आणि ती व्यक्ती या मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडली गेली. यामध्ये त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर वाकेड गावचे पोलीस पाटील जयवंत जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले तसेच अन्य पोलीस कर्मचारी यांच्यासमवेत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे तसेच अन्य कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या. शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मदतकार्याला सुरुवात झाली. प्रतिकूल परिस्थिततीवर मात करून पोलीस आणि महसूल प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवून मदतकार्य सुरु केले. सुरुवातीला दोन जेसीबी मदतकार्यासाठी लावण्यात आले होते. मात्र मातीचा ढिगारा मोठा असल्याने आणि पावसाची संततधार सुरू होती असल्याने मदतकार्यात अडचण येत होती. त्यामुळे आणखीन दोन जेसीबी या मदातकार्यासाठी लावण्यात आले. एकूण चार जेसीबींच्या मदतीने हे मदतकार्य सुरू झाले. त्यानंतर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्या वेडसर व्यक्तीचा मृतदेह प्रशनाच्या हाती लागला. प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे सुमारे सात तासांनंतर त्या वेडसर व्यक्तीला मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान, या घटनेची लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.