loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रामाणिकपणाचे उदाहरण! हरवलेला मोबाईल मालकिणीला सुखरूप परत

पनवेल : पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा आदर्श घालून दिला आहे. कामिनी गणेश दलाल (रा. मोहपाडा) यांचा मोबाईल फोन दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हरवला होता. सदर मोबाईल चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांना मिळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलची खातरजमा करून तो त्याच्या मालकिण कामिनी गणेश दलाल यांना सुरक्षितपणे परत करण्यात आला. अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने कामिनी दलाल यांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र दळवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिक व नागरिकाभिमुख कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg