loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी ग्रामपंचायत व स्वराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उत्पन्न दाखला कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी: निवळी ग्रामपंचायत आणि स्वराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निवळी गावातील हायस्कूल आणि मराठी शाळांमध्ये उत्पन्न दाखला काढण्याचा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. दि. २ व ३ जुलै रोजी दोन दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये बावनदी हायस्कूल, निवळी पूल जिल्हा परिषद शाळा, गावडेवाडी मराठी शाळा, निवळी तिठा शाळा आणि रावणंगवाडी शाळा इत्यादी शाळांना भेटी देऊन किमान २०० उत्पन्नाचे दाखले ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले. हे दाखले १५ दिवसात विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा मानस निवळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय निवळकर यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा फायदा झाला. दाखल्यासाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारणे, लागणारा खर्च आणि दिवसभराचा वेळ या सर्वांपासून त्यांची सुटका झाली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल निवळी वासियांकडून उपसरपंच संजय निवळकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला निवळी गावच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा शिवगण, गावचे तलाठी कवाळे, संगणक परिचालक विद्याताई शेवडे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष सावंत, पोलीस पाटील संजना पवार, पोलीस पाटील भालचंद्र शितल यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील पालकवर्ग उपस्थित होता.

टाईम्स स्पेशल

त्याचबरोबर मराठी शाळांमध्ये उपसरपंच संजय निवळकर यांच्या हस्ते "एक पेड मा के नाम" या उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रमही साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शाळांना आपल्या मुलांसह पालकांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg