loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार योगेशदादा कदम यांच्या निधीतून व्यापारी संकुलाला नवे संरक्षण; शेडच्या कामाला वेग

खेड : खेड शहरातील कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या वरील शेड उभारणीच्या कामाला अखेर वेग आला आहे. नामदार योगेशदादा कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या या कामामुळे व्यापारी आणि गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे आता व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गाळेधारकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्यात पावसापासून आणि उन्हाळ्यात कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी या शेडची मागणी व्यापाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर नामदार योगेशदादा कदम यांच्या निधीतून हे काम मंजूर झाल्यानंतर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सध्या काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांच्या प्रयत्नांना यश आले असून व्यापारी आणि गाळेधारकांनी त्यांचे तसेच सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

टाईम्स स्पेशल

कामाची पाहणी मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर आणि प्रभागातील नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले नगरसेविका संजना कुडाळकर यांनी केली. काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg