खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांना रविवारी राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ८ लाख रुपये, तर घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना २ लाख ६० हजार रुपये घरबांधणीसाठी मंजूर करण्यात आले. दरडग्रस्तांना शासनाच्या विविध योजनांतून आतापर्यंत सुमारे साडेदहा लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले, "दुर्घटनेत झालेली जीवित व वित्तहानी भरून काढणे शक्य नसले तरी शासन बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आर्थिक मदतीमुळे कुटुंबांना नव्याने उभे राहण्यास हातभार लागेल. आवश्यक असल्यास वाढीव मदतीचाही सकारात्मक विचार करण्यात येईल." दहिवली दौऱ्यादरम्यान त्यांनी चिंचवली-गोठलवाडी येथील भूस्खलनग्रस्त व स्थलांतरित कुटुंबांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी योग्य जागा निश्चित करणे ही प्राथमिकता असून, त्यासाठी प्रथम शासकीय जागांचा आणि आवश्यकतेनुसार खाजगी जागांचाही पर्याय तपासला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खेड तालुक्यात अलीकडील मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले. धोकादायक वाड्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून, या प्रक्रियेस नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरडग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसनाची गती आणि भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी शासन गंभीर असल्याचा संदेश या दौऱ्यातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.