loader
Breaking News
Breaking News
Foto

आज लायन्स क्लब संगमेश्वरचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - समाजसेवेचा वसा जोपासणाऱ्या लायन्स क्लब संगमेश्वरच्या २०२६-२७ या सेवा वर्षातील नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज, रविवार, १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता धामणी येथील 'द ड्राईव्ह इन' सभागृहात पार पडत आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पदाधिकाऱ्यांचा शपथविधी न होता स्नेहबंध फाउंडेशन'च्या सहकार्याने गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वस्त्रदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लायन रविकांत शिंदे, सचिव म्हणून लायन अमोल पटणे आणि खजिनदार म्हणून लायन मनीष चोचे हे सूत्रे हाती घेणार आहेत. पदग्रहण अधिकारी म्हणून माजी विभागीय अध्यक्ष एमजेएफ लायन आशिष मेहता उपस्थित राहून नूतन कार्यकारिणीला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, तर माजी प्रांतपाल एमजेएफ लायन उदय लोध यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी वर्षातील सेवाकार्याची दिशा ठरवली जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांसाठी कपडे संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे गोळा केलेले नवीन अथवा सुस्थितीतील कपडे वृद्धाश्रमातील गरजू ज्येष्ठांना वाटप केले जाणार आहेत.आरोग्य, शिक्षण,पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांत यावर्षी व्यापक स्वरूपात काम करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने केला आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि वस्त्रदान उपक्रमात सहभागी होण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने परिसरातील नागरिक, दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg