loader
Breaking News
Breaking News
Foto

लोखंडी पाईपने मारहाण करत वृद्ध मजुराला केले जखमी; खेडमधील घटना

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोंडे येथील निकम चाळ परिसरात एका चाळीस वर्षीय व्यक्तीने वृद्ध मजुरावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कालीकुमार भक्तु मेहता (वय ५५, मूळ रा. चंपाडी, झारखंड, सध्या रा. खोंडे, खेड) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ जुलै २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेहता हे दुपारचे जेवण करण्यासाठी खोंडे येथील निकम चाळीत असलेल्या आपल्या घरी आले होते. ते खोलीच्या खिडकीमध्ये ठेवलेली चावी घेत असताना, शेजारी राहणारा संशयित आरोपी विश्वास विलास निकम (वय ४०) हा अचानक त्यांच्या पाठीमागून आला.

टाईम्स स्पेशल

आरोपीने कोणत्याही कारणाशिवाय मेहता यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मेहता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर मेहता यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी १४ जुलै २०२६ रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी विश्वास विलास निकम याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१) (पूर्वीचे भा.द.वि. कलम ३२४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg