loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; कामगार सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दापोली (वार्ताहर) : महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. आर्थिक संकटातून महामंडळाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात म्हटले आहे की, महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांसारख्या शासकीय योजनांचा आर्थिक भार एसटीवर पडत असून त्याची पुरेशी भरपाई मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आर्थिक देणी वेळेवर देता येत नाहीत. तसेच, खासगी भाडेतत्त्वावरील बस, कंत्राटी चालकांची नियुक्ती आणि पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) पद्धतीमुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एसटी स्थानकांचा विकास खासगीकरणाऐवजी महामंडळामार्फतच करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टाईम्स स्पेशल

कामगार सेनेने शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, भाडेतत्त्वावरील बस बंद करून स्वमालकीच्या बस खरेदी कराव्यात, कंत्राटी कर्मचाऱ्यांऐवजी नियमित भरतीस परवानगी द्यावी, एसटी स्थानकांचा विकास पीपीपी पद्धतीने न करता महामंडळामार्फत कराव, स्वच्छतेसह आवश्यक मनुष्यबळाची नियमित भरती करावी, असे खा. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg