loader
Breaking News
Breaking News
Foto

गुंडासारखा धुडगूस घालणारे शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक

मुंबई :कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गुंडासारखा धुडगूस घालत शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दोन डॉक्टर, दोन नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना अटक केली. मात्र, विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg