loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकराचा मृत्यू!

संगलट (खेड)(इक्बाल जमादार)-मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर वहुर गावाजवळ जंगलातून अन्नाच्या शोधासाठी फिरणार्‍या भेकराचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जीव वाचवण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग ओलांडताना एका दीड वर्षाच्या भेकराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका महिन्यात दुसर्‍यांदा अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकराला धडक देण्याचा प्रकार हा दुसर्‍यांदा घडला आहे. यापूर्वी महाड जवळील पीजी सेंटरजवळ असा प्रकार घडला होता. संबंधित भेकराला त्यावेळी स्थानिक नागरिकांनी व महाड वन खात्याच्या सहकार्याने त्याचा जीव वाचला होता. अखेर त्याला औषध उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अन्नाच्या शोधात भटकणार्‍या दीड वर्षीय भेकराला गावाजवळील कुत्र्यांनी घेरले व त्यातून सुटका करण्यासाठी हे भेकर सैरावैरा पळू लागले व पळताना त्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मुंबई बाजूकडून महाडकडे येणार्‍या अज्ञात वाहनाच्या धडकेत या भेकराचा मृत्यू झाल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळतात महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील दासगाव येथील वनपाल सचिन मेने, वनरक्षक नरे ,थळकर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृत भेकराला ताब्यात येऊन महाड येथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून सदरच्या भेकरचा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नियमानुसार, सदरच्या भेकराच्या बॉडीची विल्हेवाट लावली जाईल. याप्रकरणी रोहा येथील उपवनसंरक्षक डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव सहाय्यक वन संरक्षक आशुतोष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

एकंदरीत ‘मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग’ हा वाहनांचा ‘अपघातग्रस्त भाग’ म्हणून ओळखला जात होता. मात्र आता तो वन्य प्राण्यांच्या जीवावर देखील उठल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg