loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनवेल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात होतोय श्री विठ्ठल हरिनामाचा गजर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट अंजनवेल यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल हरी नामाचा गजर सप्ताह कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार दिनांक २५ जुलै रोजी आषाढी एकादशी कार्यक्रम तसेच सोमवार दिनांक २७ जुलै रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गरम्य व शिवकालीन इतिहास असलेल्या गावामध्ये सन १८६७ या वर्षी ग्रामस्थांच्या मदतीने व वैश्यवाणी समाजाच्या पुढाकाराने विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आषाढ महिन्याचा शुभ-मुहूर्त घेऊन श्री देव विठ्ठल-रखुमाई मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्तीनी पुढाकार घेऊन पुजाअर्चा सुरू केली. हळुहळु जागृत देवस्थान म्हणून अंजनवेलचे विठ्ठल-रखुमाई मंदिर नावारूपास येऊ लागले, वेलदूर, नवानगर, तसेच आजुबाजूच्या गावातून भाविक आषाढी एकादशीला दर्शनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले. सन १८८० साली अंजनवेल गावात महाभयंकर अशी जीव घेणी साथ आली. अनेक ग्रामस्थ या साथीने बेजार व हैराण झाले. या साथीचे नाव होते प्लेग, हा हा म्हणता संपूर्ण गावात ही साथ पसरली. अनेक ग्रामस्थ यामध्ये मृत्युमुखी पडले. लहान बालकेसुध्दा यातुन वाचले नाहीत. काही करता साथ आवरेना अनेक वैदयकीय उपचार झाले. तरी काही साथ आटोक्यात येत नव्हती. म्हणून त्यावेळी गावातील प्रत्येक समाजातील प्रमुख व्यक्तीनी एकत्र येऊन श्री देव विठ्ठल-रखुमाईला साकडे घातले.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर साथीचा रोग दूर झाला व साथ आटोक्यात येऊन गावातील लोक सुखी झाले. तेव्हापासून ग्रामस्थानी विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढ महिन्यात विठ्ठलाच्या नामाचा रात्रंदिवस हरीनाम सप्ताह सुरू केला. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत (बाबा) देवळेकर, सचिव योगेश देवळेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg