loader
Breaking News
Breaking News
Foto

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह कुंभारमाठ येथे सापडला

मालवण (प्रतिनिधी) - गेले दोन दिवस बेपत्ता असलेले घुमडे राणेवाडी येथील सुरेश बाईत यांचा मृतदेह कुंभारमाठ येथील जुन्या खाणीतील पाण्यात सापडून आला. घुमडे राणेवाडी येथील सुरेश बाईत हे दि. ४ जुलै रोजी दुपारी २ वाजता रापणीला जातो असे सांगून घरातून बाहेर गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरु होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात सुरेश बाईत हे बेपत्ता असल्याची खबरही देण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी सकाळी कुंभारमाठ येथील केळूसकर मसाले दुकानाच्या बाजूला असलेल्या जुन्या खाणीतील पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी सुरेश बाईत यांचा मुलगा सिद्धेश बाईत याने त्याठिकाणी जाऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेहाची ओळख त्याने पटवल्याने तो मृतदेह सुरेश बाईत यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर हे अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg