loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

खेड (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा केंद्र क्रमांक १, जिल्हा परिषद शाळा नंबर, जिल्हा परिषद शाळा नंबर भडगाव मधलीवाडी, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दौंड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जोगळे, पत्रकार प्रभू, शिक्षक, इतर ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी अध्यक्ष लायन अविनाश दळवी, माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, लायन मिलिंदभाई तलाठी, लायन सुरेश चिकणे, लायन महेंद्र शिरगावकर, सचिव लायन उत्तम कांबळे तसेच खजिनदार लायन संदीप मोरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg