जाकादेवी (वार्ताहर) - दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने समत्व ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नुकतेच रत्नागिरी तालुक्यातील चवे गावातील चारही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तालुक्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने समत्व ट्रस्ट विविध उपक्रम राबवत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे आणि उपाध्यक्ष रुपेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे.
यंदा जे. पी. मॉर्गन चेस, मुंबई यांच्या सहकार्याने तसेच आरंभ ट्रस्टच्या अध्यक्षा शोभा मूर्ती यांच्या सहकार्यातून समत्व ट्रस्टमार्फत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक किट उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमास समत्व ट्रस्टचे विश्वस्त नरेंद्र खानविलकर, सदस्य रवींद्र महाडिक, ओरी केंद्राच्या नवनियुक्त केंद्रीय प्रमुख स्वाती भोगन तसेच शिक्षणप्रेमी किसन सागवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी चवे निवई शाळेचे मुख्याध्यापक सुहास कानडे, चवे ओलपाट शाळेच्या मुख्याध्यापिका भावना कांबळे, उपशिक्षक विकास उगीले, चवे कुणबीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सचिन गिरी तसेच उपशिक्षक द्वारकदास दळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चवे बौद्धवाडी शाळेचे मुख्याध्यापक राहुल अलकटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन चवे निवई शाळेचे उपशिक्षक सुवर्णसिंग बघेले यांनी केले. या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.