loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट मीटरची सक्ती नको:-संगमेश्वर पं. स. च्या मासिक सभेत सर्वानुमते ठराव मंजूर , अनेक प्रश्नांवर चर्चा आणि निर्णय

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर :पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती ग्राहकांना करू नये. योजनेच्या माध्यमात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गाई, म्हैशी या जिल्ह्यातूनच खरेदी करण्यात याव्यात, असे महत्वपूर्ण ठराव सभेत घेण्यात आल्याची ते माहिती सभापती शर्वरी वेल्ये यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभापती दालनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी सभापती शर्वरी वेल्ये यांच्यासह उपसभापती प्रफुल्लचंद्र बाईत, पंचायत समिती सदस्य सुरेश माईन, महेश जड्यार उपस्थित होते. मासिक सभेत झालेले ठराव, करण्यात आलेली चर्चा याबाबतची माहिती सभापती वेल्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सज्ज असतो. सरसकट झाडे दिल्याने शेतकरी लागवड करण्यास नकार घंटा वाजवतात. परिणामी ती झाडे पडून राहतात. यामुळे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वनीकरण विभागाने झाडे द्यावीत अशी मागणी करण्यात आली. यावर वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागवडीपूर्वी ग्रा.पं. ने मागणी केल्यास तशा पध्दतीने झाडे उपलब्ध करून देता येतील असे नमूद केले. बीएसएनएल कंपनीच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. कंपनीने कामकाजात सुधारणा करावी व जनतेची गैरसोय दुर करावी अशी मागणी करण्यात आली. मे महिन्यात अचानक झालेल्या वादळी वारा, पाऊस यामुळे आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची जी कागदपत्रे अपुरी असतील त्याची पुर्तता करून घ्या, असे सूचना सभापती शर्वरी वेल्ये यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.महसूल विभागावर चर्चा करताना जनतेला रेशनकार्डसाठी फेऱ्या मागाव्यात लागतात. जनतेची कामे मार्गी लागून ससेहोळपट थांबावी, असे नमूद करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

एसटी बसमधून प्रवास करताना महिलांसाठी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहेत. यासाठी ज्या कंपनीला ठेका देण्यात आला आहे त्यांनी गावोगावी जाऊन शिबिरे घ्यावीत अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी काही ठिकाणी सक्ती केली जात आहेत. जनतेला वेठीस धरले जात आहे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्मार्ट मीटर जनतेवर जबरदस्तीने लादू नयेत असा सर्वानुमते ठराव करण्यात आला.दुग्धोत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांना गाई, म्हैशी दिल्या जातात. ही जनावरे पर राज्य अथवा जिल्हयातून आणण्यात येतात. येथील हवामान त्या जनावरांना मानवत होत नाही. यामुळे जनावरांच्या दुग्धोत्पादनात घट होणे, जनावरांचा मृत्यू होणे असे प्रकार घडतात. यामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गाई म्हैशी या रत्नागिरी जिल्ह्यातूनच खरेदी करण्यात याव्यात असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg