loader
Breaking News
Breaking News
Foto

पोमेंडी बुद्रुक येथे किरकोळ वादातून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी, (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश काळ्या पवार (वय ६२, रा. पोमेंडी बुद्रुक, ता. जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते गुरे घेऊन येत असताना गावातील किशोर लुकाजी पवार हा रिक्षा घेऊ आला व आपल्या ताब्यातील रिक्षा सुरेश यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरेश यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पिलणकर अंगणात धाव घेतली. त्यानंतर किशोर धावत त्यांच्या पाठी गेला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान संशयित किशोर याने फिर्यादी सुरेश यांना पाण्याच्या पाईपने मारहाण करून ढकलून खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी व हाताच्या कोपराने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

या मारहाणीत फिर्यादींच्या डाव्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. तसेच "आज तुला ठार मारून टाकेन" अशी जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरडाओरडा ऐकून शरद सुरेश नागवेकर यांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादींची सुटका केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. झटापटीदरम्यान फिर्यादींचा मोबाईल हरवल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिएनएस कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाजीराव कदम करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg