loader
Breaking News
Breaking News
Foto

पावस जि. प. गटात 'मागेल त्याला काजू' योजनेअंतर्गत काजू रोपांचे वाटप

पावस - पावस जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून "मागेल त्याला काजू" योजनेअंतर्गत काजू रोपांचे वाटप करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख विजय चव्हाण, उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, पावस शाखाप्रमुख अभिजीत बळगे, मावळंगे शाखाप्रमुख विकास तावडे, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ थूळ, युवा सेनेचे निलेश गजने तसेच अनेक शिवसैनिक, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक राऊत यांनी आयोजकांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून शेतकऱ्यांना काजू लागवडीची योग्य पद्धत व त्यातून मिळणाऱ्या फायद्यांची सविस्तर माहिती दिली. सर्व शेतकऱ्यांनी देखील पोमेंडी येथून झाडे आणण्याचा खर्च व वेळ वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी सर्वांना रोपे मिळाल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य व सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण उपक्रमात पावस विभागाचे उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, युवा सेनेचे निलेश गजणे, पावस शाखाप्रमुख अभिजीत बळगे, प्रवीण थुळ, कैलास आडवीरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. अजूनही पाच ऑगस्टपर्यंत आपण नाव नोंदणी करू शकता. अजूनही शासकीय रोपवाटिकांमध्ये काजू रोपे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त जनतेने शेतकऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg