सावंतवाडी (प्रतिनिधी)- "आजचे युग हे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आहे. सोशल मीडिया आणि रिल्सच्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी आभासी जगात वावरत असून पुस्तकांपासून दूर चालली आहे. आभासी आणि वास्तविक जगात जमीन-अस्मानाचा फरक असून, तरुणांनी या आभासी जगातून बाहेर पडून वास्तवाचे भान ठेवणे आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे ही काळाची गरज आहे," असे परखड प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयात (स्वायत्त) सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले होते.
व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. सुरुवातीला बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी वाढत्या अमली पदार्थांच्या सेवनावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. परंतु अमली पदार्थ हे विष आहे आणि विषाची परीक्षा कधीही घ्यायची नसते, हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. चरित्र, शिस्त, स्फूर्ती आणि चैतन्याचा पाया मजबूत करून विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळवावे."
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. बापूसाहेब महाराजांनी अत्यंत अल्पकाळात सावंतवाडी संस्थानाचा जो विकास केला, त्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. त्यांचा हाच दूरदर्शीपणाचा आदर्श आजच्या तरुण पिढीने समोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. माधव भिसे यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा जीवन परिचय करून देताना सांगितले की, महात्मा गांधींनी बापूसाहेबांना 'रामराजा' तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 'न्यायनितीज्ञ राजा' असे संबोधले होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.