loader
Breaking News
Breaking News
Foto

खेम धरण पाण्याने तुडुंब भरले; हर्णे वासीयांची पाण्याची चिंता मिटली

दापोली (वार्ताहर) : हर्णे गावाला पाणी पुरवठा करणारे हर्णे सरहद्दीवरील अडखळ हद्दीतील खेम धरण पाण्याने तुडूंब भरले असून धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. एवढे ते पाण्याने तुडूंब भरले आहे. हर्णे गावाला सुरळीतपणे व नियमित सुरू असलेला पाणी पुरवठा धरण आटल्याने फेब्रुवारी महीण्यातच बंद पडला होता. तो आता जुलै महीण्यापासून सुरळीतपणे सुरू झाला आहे. त्यामुळे हर्णे वासीयांची पाण्याची चिंता आता पुर्णपणे मिटली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीसाठी सुप्रसिध्द असलेल्या हर्णे बंदर गावासह जिल्ह्यात सर्वाधिक मच्छिमारी समाज बांधवांची वस्ती असलेल्या पाजपंढरी या गावांसह पाळंदे आणि अडखळ या गावांची तहान भागवणाऱ्या खेम धरणाच्या बांधकामास १९७१ मध्ये सुरुवात करण्यात आली. ते साधारणपणे १९७४ मध्ये बांधुन पूर्ण झाले. खेम धरणाच्या पाणी साठयाची क्षमता ३६ कोटी ४५ लाख लिटर म्हणजेच १३.५० एमसीएफटी आहे. अशा या खेम धरणातून आता फक्त हर्णे गाव, पाळंदे आणि अडखळची खेमवाडी यांनाच या धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील हर्णे हे गाव लोकसंख्येच्या मानाने खुपच मोठे गाव आहे. या गावात मच्छिमारी बंदर असल्याने या गावात एक मोठी व्यापारी बाजार पेठ आहे. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या संख्येने येथे परगावातुन तसेच परप्रांतीय मजूर कामाला येत असतात. हर्णे गावाला पाणी पुरवठा करणा-या खेम तसेच बांधतिवरे या नळपाणी पुरवठा योजना असल्या तरी हर्णे वासीयांची पाण्याची भिस्त ही प्रामुख्याने अडखळ येथील खेम धरणावरच अवलंबून असते. अशा या खेम धरणातील पाणी यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आटले. त्यामुळे हर्णे वासीयांना पाण्यासाठी बांधतिवरे धरणावर अवलंबून राहावे लागले. मात्र बांधतिवरे येथून हर्णे येथे येणारी पाण्याची पाईप लाईन ही डोंगर द-या झाडीतून तसेच खुपच लांबून येत असल्याने आणि पाईप लाईन जीर्ण झाल्याने ठिक ठिकाणी पाण्याची गळती सुरू होते.

टाईम्स स्पेशल

खेम धरणातून पाणी पुरवठा बंद पडल्यानंतर बांधतिवरे येथून सुरूवातीला आठवडयातून एकदा त्यानंतर दोन महिने १५ दिवसातून एकदा पाणी सोडले जात होते. त्यामुळे हर्णेवासीयांची पाण्याची मोठीच समस्या निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्याला खेम धरण सुद्धा अपवाद राहिले नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या धरणातून ७ जुलै पासून नियमित पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने हर्णे गावातील रहिवाशांची पाण्याची टंचाईची समस्या पूर्णपणे मिटली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg