loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा कक्षाच्या अध्यक्षपदी मंगेश भोसले

चिपळूण, (ओंकार रेळेकर) - मराठा सेवा संघाच्या रत्नागिरी जिल्हा कक्षाची संघटनात्मक पुनर्रचना, बळकटीकरण आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने दि. ४ जुलै रोजी सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निक महाविद्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा कक्षाची पुनर्स्थापना करण्यात आली. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, प्रदेशाध्यक्ष इंजी. विजय घोगरे, प्रदेश उपाध्यक्ष इंजी. संजय देसाई, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजी. उत्तमराव माने, केडर मार्गदर्शक प्रेमकुमार बोके आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्या प्रेरणा व सहकार्याने ही पुनर्स्थापना पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य मंगेश भोसले, जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप राजेशिर्के, दिनेश खानविलकर व शत्रुघ्न मोरे, जिल्हा सचिवपदी नरेश यशवंतराव आणि जिल्हा कोषाध्यक्षपदी एकनाथ गावडे यांची निवड करण्यात आली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, संचालक गुलाबराव सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, नूतन जिल्हा परिषद सदस्य संजयराव कदम तसेच उद्योजक सुयश कदम यांचा मराठा सेवा संघाच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे संयोजन दिनेश खानविलकर यांनी केले. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघ अधिक सक्षम, सशक्त आणि समाजाभिमुख करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg