loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएफ अंशदान भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ

मुंबई - इंडसइंड बँकेने केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सोबत यशस्वी एकत्रीकरण (इंटिग्रेशन) केल्याची घोषणा केली आहे. या एकत्रीकरणामुळे नियोक्ते आणि संस्थांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अंशदान भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुरक्षित झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सुविधेमुळे नियोक्ते आणि संस्था ईपीएफओ पोर्टलवर इंडसइंड बँकेची निवड करून बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग तसेच 'इंडी फॉर बिझनेस' (एमएसएमई) डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहजपणे पीएफ अंशदान भरू शकतील. याशिवाय, 'इंडस डायरेक्ट' मोबाईल बँकिंग अॅपद्वारेही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एकत्रीकरणामुळे इंडसइंड बँकेचे ग्राहक ईपीएफओ पोर्टलवरून थेट आणि सुरक्षित पद्धतीने पीएफ अंशदान जमा करू शकतील. त्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होण्याबरोबरच उद्योग, कंपन्या आणि विविध संस्थांना त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करणे शक्य होणार आहे.

टाईम्स स्पेशल

देशातील महत्त्वाच्या वैधानिक देयकांपैकी एक असलेल्या ईपीएफ अंशदान प्रक्रियेला इंडसइंड बँकेच्या डिजिटल बँकिंग प्रणालीशी जोडणारे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे बँकेने म्हटले आहे. या उपक्रमामुळे व्यवसाय आणि संस्थांसाठी विश्वासार्ह बँकिंग भागीदार म्हणून इंडसइंड बँकेचे स्थान अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg