loader
Breaking News
Breaking News
Foto

अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा ’सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ने उद्या होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

रत्नागिरी, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ’सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना ’सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुरलीधर मोहोळ, सहकार राज्यमंत्री भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील योगदानाची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात असून, अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या पुरस्कार निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg