loader
Breaking News
Breaking News
Foto

ऋण फाउंडेशनच्या वतीने अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील, राष्ट्रवादी काँगेस पार्टी ऋण फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके, लोकनेते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प. आ. बा.सावंत माध्यमिक विद्यालय, नायशी येथे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ऋण फाउंडेशनचे कार्याध्यक्ष- अक्षय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य (धामापूर गट) सुशील बबन भायजे, संस्थेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक किशोर घाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच कळंबूशी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल चव्हाण, माजी संचालक दत्ताराम म्हापर्ले, तसेच ऋण फाउंडेशनचे पदाधिकारी सिद्धेश चव्हाण, मंदार चव्हाण, ऋत्विज घाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सातत्यपूर्ण परिश्रमातून उज्ज्वल व चमकदार यश संपादन करून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा," असे आवाहन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक-सिद्रया उत्तरे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या व शाळेच्या वतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाबद्दल संस्थेचे संचालक किशोर घाग यांनी या शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप घाग यांनी केले तर सर्व मान्यवर, ऋण फाउंडेशनचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच उपस्थितांचे आभार राजेश माळी यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg