loader
Breaking News
Breaking News
Foto

गुंबद मोहल्ला, सैतवडे येथे मुसळधार पावसामुळे चार वीज खांब कोसळले; रस्ते बंद, वीजपुरवठा खंडित

रत्नागिरी : जमीर खलफे :गुंबद मोहल्ला सैतवडे येथील गुंबद मस्जिदजवळ, लेन मोहल्ल्यात मकसूद पागरकर यांच्या घरासमोर रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे एमएसईबीचा एक वीज खांब कोसळला. या खांबाच्या वजनामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या घाटीतील आणखी तीन वीज खांबही एकामागोमाग कोसळले.या घटनेमुळे वीज वाहिन्या दि मॉडेल इंग्लिश स्कूल तसेच वरील वाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तुटलेल्या वीज वाहिन्या रस्त्यावर पडल्याने गुंबद मशीदीकडून लेन मोहल्ल्याकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चार वीज खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. घटनेची माहिती तातडीने एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून ते घटनास्थळी येऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासह रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेणात आले आहे.दरम्यान, वीज वाहिन्या रस्त्यावर पडलेल्या असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित होईपर्यंत या मार्गांचा वापर करू नये, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg