loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. आदर्श पाटील यांच्या ‘ऑर्थोपेडिक क्लिनिक’चे सानपाड्यात दिमाखात उद्घाटन;

नवी मुंबई - सानपाडा सेक्टर-१ येथे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आदर्श पाटील यांच्या नूतन ऑर्थोपेडिक क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आदर्श पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, नगरसेविका माधुरी सुतार, शैला पाटील, शुभांगी पाटील शशिकला पाटील, नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका शिल्पा ठाकूर, माजी मनपा विरोधी पक्षनेते नामदेव भगत, ठाणे जिल्हा कॉंग्रेसअध्यक्ष राहुल पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी, सुभाष हांडे देशमुख, परशुराम ठाकूर, गणेश कमळे, मराठी अभिनेता अशोक पालवे, डॉ. रविन्द्र इंगळे, डॉ. उसनाळे, डॉ. भूषण जैन, डॉ. सांगळे, डॉ. श्रीमंत जगताप, माजी जिल्हाधिकारी सुनील शेळके, माजी उपआयुक्त दत्तात्रय नागरे, चंद्रकांत तायडे विविध क्षेत्रातील समाजसेवक, डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांनीही या सोहळ्याला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्घाटनप्रसंगी बोलताना पालघर जिल्हा पालकमंत्री ना.गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुजाता पाटील यांनी डॉ. आदर्श पाटील यांच्या वैद्यकीय कौशल्याचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg