loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रकांत बाईत विद्यालय, आबलोली येथे डॉ. साक्षी उकार्डे, प्राची पोतदार - कारेकर यांचा विशेष गौरव

आबलोली(संदेश कदम) - वैद्यकीय क्षेत्रात व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नावलौकिक प्राप्त केलेल्या विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ नुकताच विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. साक्षी दत्ताराम उकार्डे व कलाक्षेत्रात प्राची जयेंद्र पोतदार - कारेकर (प्रसिद्ध चित्रकार) हिने पाठ्यपुस्तक निर्मिती बालभारतीमध्ये इयत्ता तिसरी - चौथीच्या पुस्तकांमध्ये काढलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या दोघींचेही कार्य आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद आहे. या कार्याची दखल घेऊन या दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डी.डी.गिरी, संस्थेचे सचिव राकेश साळवी, संचालक दिनेश नेटके, प्राचीचे आई-वडील व पती जयेंद्र पोतदार तसेच विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी सौ.प्राची व डॉ. साक्षी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत यांनीही या दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यालयाची गुणवत्ता व परंपरा याबद्दल समाधान व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाचा विशेष उल्लेखनीय भाग म्हणजे या कार्यक्रम प्रसंगी माननीय कार्याध्यक्ष व आजचे सत्कारमूर्ती यांच्या हस्ते मुलींसाठी स्वतंत्र फुलराणी कक्षाचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव ढवळ यांनी केले. आभार प्रदर्शन व्हनमाने सर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg