loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी विरेन्द्र कदम

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी हिवाळे येथील विरेन्द्र दिनेश कदम यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भानुदास येरागी (तारकर्ली- देवबाग) आणि विठ्ठल धुरी (पारवाडी-आचरा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मालवण येथील अथर्व मंगल कार्यालयात तालुक्यातील पोलीस पाटीलांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पुढील एक वर्षासाठी संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीस तालुक्यातील ७२ पोलीस पाटील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन कार्यकारिणीत सचिवपदी सिताराम नागेश सकपाळ (त्रिंबक), सहसचिवपदी नितेश कुणकवळेकर (कुणकवळे) व जगन्नाथ जोशी (गाउडवाडी-आचरा), खजिनदार पदी समीक्षा सतीश सुकाळी (कर्लाचाव्हाळ), सहखजिनदारपदी आशिष आपटे (मोगरणे) व सचिन आचरेकर (भगवंतगड) यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी शीतल उदय परब (कांदळगाव) आणि संतोष गोविंद जामसंडेकर (तिरवडे) यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पोलीस पाटीलांनी अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटलांचे विविध प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg