loader
Breaking News
Breaking News
Foto

जंतरमंतरवर आंदोलन सुरुच, वांगचूक यांचा २४ वा उपोषण दिवस, केंद्र सरकारकडून चर्चेचे संकेत

नवी दिल्ली - नीट पेपरलिक, परिक्षेमध्ये गोंधळ, आणि शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे आंदोलन राजधानीत सुरुच आहे. सोमवारी सीजेपी समर्थकांनी संसदेच्या दिशेने मार्च काढला. आंदोलन सुरुच असल्याने केंद्र सरकारने चर्चेचे संकेत दिले आहेत. मिडीया रिपोर्टनुसार केंद्र सरकार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात तयार आहे. आणि याबाबत लवकरच पाऊल उचलले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

असे म्हटले जात आहे की, काल सोमवारी आंदोलनाच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर केंद्रिय मंत्री जे.पी.नड्डा यांनी चर्चा केली. त्यावेळी शिष्ट मंडळाने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याची भूमीका केंद्र सरकारने घेतली आहे. मात्र अजून ठोस निर्णय झालेला नाही. सरकारने उचललेल्या पावलानंतर पडद्यामागे काही घडामोडी सुरु आहेत.

टाईम्स स्पेशल

कॉकरोच जनता पार्टीचे जंतरमंतरवर आजही आंदोलन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी कालच्या घटनेमध्ये १०० पोलिस आणि अनेक आंदोलक जखमी झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असून हिंसा आणि तोडफोडीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्याचवेळी आंदोलनाच्या नेत्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर दांडगाईचा प्रयोग केला. धरणे आणि आंदोलन सुरुच राहणार आहे. दरम्यान २४ व्या दिवशी देखील सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरुच आहे. त्यांनी मागणी केली आहे की, केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचूक यांची बिनशर्थ सुटका आणि नीट पेपरलीकमध्ये आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचूक यांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg