loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडकी बहिण योजनेत ९२ लाख लाभार्थी महिला निकषाबाहेर, ई-केवायसी अनिवार्य

मुंबई - लाडकी बहिण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतून अजूनपर्यंत ९२ लाख लाभार्थ्यांना निकषाअभावी वगळण्यात आले आहे. राज्यातील लाभार्थी महिलांची पडताळणी केली असता अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकारने ई-केवायसी सत्यापनमध्ये या योजनेतून बाहेर केले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांची संख्या २.४३ कोटी वरुन १.५ कोटी राहिली आहे. यापूर्वी ५४ लाख महिलांची नावे मे महिन्यामध्ये कमी झाली आहेत. उत्पन्नाचा आधार, सरकारी नोकरी आणि एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणार्‍या तसेच वयोमर्यादा पार करणार्‍या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

६२ लाख लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, १६ लाख कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त आहे. ४.४२ लाख प्रकरणात लाभार्थ्याचे नातेवाईक सरकार कर्मचारी, २.५ लाख कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ, १.८ लाख महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आढळले. २९ हजार पुरुषांनी चुकिच्या पद्धतीने योजनेचा लाभ उठविला. त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे पुन्हा अनिवार्य झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg