loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी समाजोन्नती संघाकडून ज्योती रामदासभाई कदम यांचा खेड तालुक्यातील जामगे येथे विशेष सत्कार

खेड(प्रतिनिधी)- राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेडच्या अध्यक्षा ज्योती रामदासभाई कदम यांचा खेड तालुक्यातील जामगे येथे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष, शिवसेना रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, शिवसेना माणगाव शहरप्रमुख नितीन दसवते तसेच शिवसेना संपर्क शहरप्रमुख प्रसाद धारिया यांनी ज्योती कदम यांची भेट घेऊन, त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक, पर्यावरण संवर्धन आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमधून ज्योती रामदासभाई कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या या यशामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

यावेळी उपस्थितांनी ज्योती कदम यांच्या कार्याचे कौतुक करत समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी पुढेही अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या. सत्काराबद्दल ज्योती कदम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत हा सन्मान समाजहिताच्या कार्यासाठी प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg