loader
Breaking News
Breaking News
Foto

खारेपाटणहून बेळगावला गुरांची बेकायदेशीर वाहतूक; टेम्पोसह दोघे ताब्यात

वैभववाडी (प्रतिनिधी) - खारेपाटण येथून बेळगाव येथे बेकायदेशीररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत. विवेक शामराव कांबळे राहणार निपाणी व रुपेश जाधव राहणार कोदवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी अशी संशयितची नावे आहेत, ही कारवाई शुक्रवारी सकाळी भुईबावडा हेत फाटा येथे करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संदीप कांबळे, रणजीत सावंत, हरीश जायभाय व श्रीकांत कराळे हे भुईबावडा परिसरात गस्त घालत असताना खारेपाटण गगनबावडा मार्गावरील हेत फाटा येथे वाहनांची तपासणी करत असताना खारेपाटनहुन गगनबावड्याकडे जाणारा संशयित टेम्पो आल्याने थांबून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान टेम्पोच्या होऊद्यात चार गाई व दोन पाढे अशी एकूण सहा गुरे अत्यंत दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले.

टाईम्स स्पेशल

याबाबत चालक विवेक कांबळे व त्यांच्यासोबत असलेले रुपेश जाधव यांच्याकडे चौकशी केली असता ही गुरे खारेपाटण येथील इम्रान लफित खान यांच्याकडून घेऊन बेळगाव येथे नेत असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी टेम्पोसह गुरे ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात आणत जप्त करण्यात आलेली गुरे कुसूर येथील गोशाळेत ठेवण्यात आली आहेत. संशयित आरोपी विवेक कांबळे व रूपेश जाधव यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg