बांदा (प्रतिनिधी) - डेगवे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील वर्गखोल्यांसमोरील ओरंड्याचे छप्पर रविवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हीच घटना शाळा सुरू असताना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या शाळेत केवळ एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत तीन वर्गखोल्या आहेत. त्यापैकी दोन वर्गखोल्या वापरात आहेत. वर्गखोल्यांसमोरील ओरंड्याचे छप्पर पूर्णपणे कोसळल्याने शाळेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी शाळेची जीर्ण अवस्था पाहून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपसरपंच मंगेश देसाई यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वीच ओरंड्याचे छप्पर पूर्णपणे मोडकळीस आले होते. संभाव्य धोका लक्षात घेऊन सरपंच राजन देसाई यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी प्लास्टिक ताडपत्री लावून तात्पुरती व्यवस्था केली होती. मात्र, अखेर रविवारी मध्यरात्री हे छप्पर कोसळले. त्यामुळे या धोकादायक इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य नितीन राऊळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईतूनच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. डेगवे येथील घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात इतरत्र होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने सर्व जुन्या व जीर्ण शाळा इमारतींची तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे जिल्ह्यातील जीर्ण शाळा इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.