loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली येथील ग्रामस्थांचे अवैध उत्खनन, वृक्षतोड आरोप बिनबुडाचे - गौरव बिडये

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सासोली येथील काही ग्रामस्थांनी ओरिजिन कंपनीवर केलेले वृक्षतोड व अवैध उत्खननाचे आरोप पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे व खोडसाळ असल्याचा दावा कंपनीतर्फे कुलअखत्यारपत्रधारक गौरव दत्ताराम बिडये यांनी केला. कंपनीची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच कंपनीच्या मशीन ऑपरेटरला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचाही गंभीर आरोप बिडये यांनी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बिडये म्हणाले की, सर्व्हे क्रमांक १७० व १७१ मधील सामायिक जमिनीची वहीवाटी प्रमाणे पोट हिस्सा मोजणी होवून जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे व नकाशा उपलब्ध आहेत. या मोजणीस ग्रामस्थांकडून कोणत्याही न्यायलयामध्ये आव्हान देण्यात आलेले नाही त्यामुळे सदर जमिनीचे नकाशा व सातबारा कायम स्वतंत्र झालेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी ही सामाईक जमीन असल्याचा काही ग्रामस्थ दावा करून वारंवार आमच्या स्वतंत्र वहीवाटीच्या मिळकतीमध्ये ट्रेसपास करीत आहेत. जे बेकायदेशीर आहे. या सर्व्हे क्रमांकातील जमीन सपाटीकरणासाठी महसूल प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली असून त्यानुसारच काम सुरू आहे. कामादरम्यान कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा अवैध उत्खनन करण्यात आलेले नाही. तसेच मातीची वाहतूकही सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ग्रामस्थ जाणीवपूर्वक दुसर्‍या ठिकाणच्या वादळी पावसामुळे पडलेल्या झाडांचे फोटो वायरल करून ते सासोलीमध्ये वृक्षतोड होत असल्याचे जिल्हा प्रशासनास भासवुन कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी कंपनीकडे आर्थिक मागणी केली होती. मात्र ती पूर्ण न झाल्यानेच कंपनीविरोधात बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचा आरोपही बिडये यांनी केला.

टाईम्स स्पेशल

रविवारी काही ग्रामस्थ कंपनीच्या मालकीच्या जमिनीत घुसले व तेथील मशीन ऑपरेटरला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेमुळे संबंधित ऑपरेटर प्रचंड भयभीत झाला असून सोमवारी तो कामावरही हजर राहू शकला नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी कंपनीची नाहक बदनामी थांबवावी असे बिडये यांनी म्हटले आहे. आमचा हा प्रकल्प पर्यावरणाला कोणतीही हानी न करता सूरु आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात सेकेंड होमचा हा प्रकल्प असल्याने वृक्षतोड करण्यासाचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच या प्रकल्पात जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असल्याने ते सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारे माती उत्खनन करून त्याची वाहतूक होत नाही असेही यावेळी बिडये म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg