loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी-कोलगाव मार्गावर धावत्या डंपरवर झाड कोसळले; मोठा अनर्थ टळला, चालक सुखरूप

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी जवळील कोलगाव परिसरात एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास कोलगाव येथील यामाहा शोरूमजवळून जाणाऱ्या एका धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडचे मोठे झाड कोसळले. या थरारक घटनेत डंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर आपल्या मार्गाने जात असताना अचानक हे झाड थेट चालत्या गाडीवर आले. झाड कोसळल्याच्या भीषण आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, डंपर चालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि नशिबाची साथ यामुळे चालक पूर्णपणे सुखरूप असून, अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही.

टाईम्स स्पेशल

​या अपघातामुळे सावंतवाडी-कोलगाव मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. नंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg