loader
Breaking News
Breaking News
Foto

शब्दांच्या पलीकडले’ ब्रेल रूपांतरण प्रकाशन सोहळ्यात उत्कृष्ट निवेदक म्हणून उत्तमकुमार जैन यांचा गौरव

खेड - नयनबिंदू सभागृह, घराडी येथे आयोजित ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाच्या ब्रेल रूपांतरण प्रकाशन सोहळ्यात उत्कृष्ट निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल खेड येथील उत्तमकुमार जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), मालवण शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते जैन यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जैन यांच्या प्रभावी, ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निवेदनशैलीचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या वैशिष्ट्‌यपूर्ण सूत्रसंचालन व निवेदनातून श्रोत्यांवर छाप पाडणारे उत्तमकुमार जैन यांनी निवेदन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रमाच्या आशयाला साजेशी भाषा, प्रसंगानुरूप निवेदन आणि श्रोत्यांशी सहज संवाद साधण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाचे ब्रेल रूपांतरण प्रकाशित करून दृष्टिहीन बांधवांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणार्‍या या कार्यक्रमात उत्तमकुमार जैन यांच्या सत्कारामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. या गौरवाबद्दल साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून उत्तमकुमार जैन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg