सावंतवाडी, (प्रतिनिधी) सावंतवाडी नगर परिषदेच्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टक्केवारीच्या आरोपांवरून आणि विकास कामांच्या मुदतवाढीवरून प्रचंड खडाजंगी पाहायला मिळाली. माजी नगराध्यक्ष संजू परब आणि देव्या सूर्याजी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तंग झाले होते. अखेर नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी हस्तक्षेप करत विविध प्रकरणांमध्ये चौकशीचे आश्वासन देऊन वादावर पडदा टाकला. ही बैठक नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, ज्याला उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. विषय सूचीवरील तब्बल १८ विकास कामांच्या मुदतवाढीवरून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रशासनाला धारेवर धरले. "दोन टक्क्यांचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे शहरात अन्य समस्या नाहीत का?" असा सवाल करत त्यांनी वेळ पडल्यास पुरावे देण्याचा इशारा दिला. यावर सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आव्हान देताच, परब यांनी चार विकास कामांचे पुरावे सभागृहात सादर केले.
काम पूर्ण होऊन, प्रशासनाने बिलापोटी काढलेले धनादेश महिना उलटला तरी संबंधित ठेकेदारांना का दिले नाहीत, असा जाब त्यांनी विचारला. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी काम पूर्णत्वाचे दाखले आणि चेक काढल्याचे मान्य केले, मात्र चेक का दिले नाहीत यावर ते निरुत्तर झाले. शेवटी नगराध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले. याच विषयाचा धागा पकडत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी टक्केवारीच्या आरोपांमुळे नगरपालिकेची बदनामी होत असून हा सभागृहाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेवरून मुख्याधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांचा खुलासा करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्रेस नोट काढावी, अशी मागणी सूर्याजी यांनी केली. यावर सभापती आडीवरेकर यांनी आक्रमक होत साळगावकर यांच्यावरच योजनेची वाट लावल्याचा आरोप केला.
शहरातील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पिरापर्यंतच्या नाला बंदिस्तीच्या कामाला मुदतवाढ देण्यावर देव्या सूर्याजी व देवा टेमकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित ठेकेदार तकलादू काम करत असल्याने त्याला कायमस्वरूपी 'ब्लॅकलिस्ट' करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, अग्निशमन केंद्र, जिमखाना ड्रेसिंग रूम आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाच्या विद्युतीकरणाच्या कामातील दिरंगाईबद्दल नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आवाज उठवला. जिमखाना ड्रेसिंग रूमचे काम अर्धवट असताना बिल अदा केल्याबद्दल त्यांनी चौकशीची मागणी केली. यावर दोषी आढळल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. बॅरिस्टर नाथ पै सभागृह विनामूल्य मिळण्याबाबत सनातन संस्थेच्या अर्जावर संजू परब व सुधीर आडीवरेकर यांच्या संमतीने संपूर्ण सभागृहाने मंजुरी दिली. गाळे धारकांकडून थकीत भाडे वसूल केल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या मूल्यांकनानुसार नवीन भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंद अवस्थेत असलेल्या पर्यटक स्वागत केंद्राच्या इमारतीची खर्चासहित टेंडर काढून दुरुस्ती करावी, अशी मागणी बाबू कुडतरकर यांनी केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.