loader
Breaking News
Breaking News
Foto

रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडले, दुर्गधीने काळबादेवी ग्रामस्थ हैराण

रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील निर्सगरम्य काळबादेवी गावातील एका रिसॉर्टच्या मालकाने सांडपाणी समुद्रात सोडल्याचा दावा ग्रामस्थांनी केल्यानंतर आरोग्य अधिकारी गावात दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.याबाबतचा अहवाल आपण पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणार असल्याची माहीती कोतवडे प्राथमिक आरोग्य र्केद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ.मुक्तेश्वरी पाखरे यानी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान या रिसॉर्टचे पाणी उघडयावर सोडण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्या पसरले आहे. काळबादेवी येथील टेंबरेवाडीत अवैय्या हे आलिशान रिसॉर्ट असून अल्पावधीतचे हे संर्पूूण देशात प्रसिध्दीस पावले आहे. रत्नागिरी जिल्हयातील पर्यटकांसह देशभरातील पर्यटक याठिकाणी आर्वजुन येत असतात. याच रिर्साटचे सांडपाण्याची व्यवस्था मात्र केेलेली नाही. ग्रामस्थांनी याबाबत अनेक तक्रारी करूनही अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेेले वर्षभर ग्रामस्थ सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारत होते मात्र त्यानीही याकडे ढुंकुनही पाहीेले नाही. अख़ेर या ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रार करताच त्यांनी कोतवडे प्राथमिक आरोग्य र्केद्राच्या अधिकार्‍यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कोतवडे प्राथमिक आरोग्य र्केद्राच्या अधिकारी डॉ.मुक्तेश्वरी पाखरे, परिचारिका गौरी नागवेकर, आशासेविका वेदा शेटये यानी पहाणी केली. यावेळी काळबादेवीतील जागृत ग्रामस्थ प्रतिक नार्वेकर, सौ.नंदीनी शेटये उपस्थित होते. दरम्यान कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडले जात असेल तर ग्रामस्थ ते खपवून घेणार नाहीत. तुम्ही व्यवसाय करा पण ग्रामस्थ,पर्यटकांना त्रास होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर वरिष्ठ कार्यालयांचे दरवाजे ठोठावू असा इशाराही काळबादेवी ग्रामस्थांनी दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg