रत्नागिरी, : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या “कर्तव्य जागर फेस्ट २०२६-२७” अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या “१००० झाडे लावण्याचा संकल्प” या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज पोदार इंटरनॅशनल स्कूल, कारवांची वाडी, रत्नागिरी येथे उत्साहात झाली. या वृक्षारोपण कार्यक्रमात पोदार इंटरनॅशनल स्कूल व इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना झाडे लावताना खड्डा कसा तयार करावा, रोपाची योग्य पद्धतीने लागवड कशी करावी, माती भरताना कोणती काळजी घ्यावी, तसेच कंपोस्ट खताचे योग्य प्रमाणात मिश्रण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वृक्षारोपणासोबतच झाडांचे संगोपन व संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना “झाडांवर प्रेम करा… झाडेही तुमच्यावर प्रेम करतील” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या इव्हेंट चेअर रोटे. माधुरी कळंबटे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव रोटे. आनंद चौगुले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड, वरिष्ठ रोटेरियन धरमसीभाई चौहान, विजय पवार, विनायक हातखंबकर, तन्वी साळुंखे, प्रसाद हातखंबकर, सचिन जाधव तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका आर्वी पाटील उपस्थित होत्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.