loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा परिसरात डेंग्यू प्रादुर्भावाबाबत उपाययोजना सुरु असल्या तरी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन

बांदा (प्रतिनिधी) - बांदा परिसरात डेंग्याचा प्रादुर्भाव वाढत असून सध्या सात संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवत आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्सुली येथील एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची स्पॉट टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, अधिक खात्रीसाठी त्याचा रक्तनमुना तपासणीसाठी ओरोस येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. संबंधित रुग्ण गोव्यातून थेट उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर त्याबाबत स्पष्टता होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तापाच्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून संशयित रुग्णांची तपासणी, उपचार आणि आवश्यक ते रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावोगावी डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध घेणे, जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवावीत, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत आणि ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत आणि डेंग्यूबाबत कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg