loader
Breaking News
Breaking News
Foto

संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एसटी सवलत कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर(प्रतिनिधी)- संगम ज्येष्ठ नागरिक संघ संगमेश्वरच्या वतीने एसटी सवलत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन काल संगमेश्वर येथील विधाता हॉलमध्ये करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकाच दिवशी तब्बल २१० ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावल्याने आणि लोकांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, शनिवार, दि. १८ जुलै रोजी पुन्हा एकदा नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकार्‍यांनी दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी एसटीचे प्रतिनिधी तराळे, संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेटये, उपाध्यक्ष उदय संसारे, सचिव श्रीकृष्ण बेंडके, तसेच रामभाऊ दोरकडे आणि दादा कोळवनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

टाइम्स स्पेशल

सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिराचे नियोजन सुरळीतपणे पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. येत्या १८ जुलै रोजी होणार्‍या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संगम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg