राजापूर, दि. _ : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत सार्वजनिक आरोग्य विभागातील १५,०१० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा समावेशनाचा लाभ मिळणार आहे.या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी व अधिकारी, राजापूर आणि लांजा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद रत्नागिरीचे आरोग्य व बांधकाम सभापती विलास चाळके यांचेही सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.याप्रसंगी आमदार किरण सामंत यांनी सेवा समावेशनाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे लवकरात लवकर मिळावीत यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास राहुल कोकणे, मिलिंद संसारे, किरण गुंजवटे, सचिन कागले, मिथिन मयेकर, डॉ. सोनवणे मॅडम, श्रीमती गोंधळेकर, श्रीमती भाटकर, श्रीमती कदम तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.