loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये तालुकास्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुका तिरंदाजी (आर्चरी) असोसिएशन, गुहागर आणि यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा निवड चाचणी म्हणूनही घेण्यात येणार असून, रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी शृंगारतळी येथील ओंकार मंगल कार्यालय हॉल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील विविध आर्चरी खेळाडू सहभागी होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धनुर्विद्या खेळाला चालना देणे, ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. "एकाग्रता, ध्येय, शिस्त आणि विजय" हा संदेश देत स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg