loader
Breaking News
Breaking News
Foto

काताळे बौध्दबांधवांचा ठाम निर्धार, कुणीही राजकीय, धार्मिक रंग लावू नये

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील काताळे बौध्दवाडी बांधवांसाठीची स्मशानभूमीची जागा ही शासकीय आहे. वाडीतील कुटुंबांना पाणी योजनेच्या विहिरीसाठी अन्यत्र कुठेही जागा नाही. त्यामुळे पाणी आमच्यासाठी महत्वाचे असून येथे होणाऱ्या विहिरीवरुन कुणीही राजकीय वा धार्मिक रंग लावू नये, जमीन उपलब्ध असल्याने विहीर येथेच बांधण्यात येईल, असा ठाम निर्धार काताळे बौध्दवाडीवासियांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. काताळे बौध्दवाडी स्मशानभूमीच्या जागेत थडगी पाडून त्या ठिकाणी विहिरीचे बांधकाम सुरु असल्याची तक्रार येथील माजी सरपंच अशोक पवार यांनी करुन गुहागर तहसिल कार्यालयासमोर उपोषण केले होते. निवेदनातून त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन व काही ग्रामस्थांना दोष देत त्यांच्यावर नाहक बदनामी केल्याचा आरोप केला होता. यावर खुलासा करण्यासाठी काताळे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काताळे बौध्दवाडी स्मशानभूमी ही २४ गुंठे जागेत असून ही जागा शासकीय आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत ही जागा असल्याने येथे मोकळ्या जागेत शासनाची एखादी पाणी योजना राबविण्यासाठी येथे विहीर खोदावी असा प्रस्ताव बौध्दवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे दिला होता. तत्पूर्वी यावेळच्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन येथे पाण्याचे स्त्रोत जवळच असल्याने लगेच पाणी मिळेल व ग्रामस्थांची तहान भागेल या हेतूने येथे मोठा खड्डा पाडला. तेथेही पाणीही लगेच लागले. त्यामुळे येथेच विहीर पाडणे गरजेचे असल्याचे बौध्दवाडी ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला सूचित केले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, या खोदाईच्या काही मीटर अंतरावर अशोक पवार यांची विहीर असल्याने येथे विहीर पाडल्यास माझ्या विहिरीवर परिणाम होईल, असे पवार यांचे खरे कारण आहे मात्र, त्यांनी स्मशानभूमीतील पुरातन थडग्यांचे कारण पुढे करुन धार्मिक रंग लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप काताळे गाव अध्यक्ष विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच अनंत पवार यांची कधीही आमच्यात ऊठबस नसते. हे कुटुंब वाडीपासून वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई अध्यक्ष सूर्यकांत मोहिते यांनीही आम्हाला पाणी महत्वाचे असून विनाकारण कुणीही समाजबांधवाने यामध्ये राजकीय रंग लावू नये असे सांगितले. या पत्रकार परिषदेला बहुसंख्य बौध्दबांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg