loader
Breaking News
Breaking News
Foto

राहुल गांधी यांच्या नाकातून घळाघळा रक्त , विरोधी पक्ष नेत्याच्या छातीवरही जखम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान त्यांच्या नाकातून रक्त निघत होते. असा आरोप केला जात आहे की त्यांना ताब्यात घेताना झटापट होऊन त्यांच्या नाकाला गंभीर जखम झाली. त्यंच्या छातीवर जखम झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले .दरम्यान पीएम मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणारे प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले .राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियम येथे नेण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की खासदार प्रियंका गांधी यांना फरफटत नेण्यात आले.असे सांगण्यात आले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मीडिया वृत्तानुसार राहुल गांधी रस्त्यावर बसले आणि त्यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी यांना ओढत घेऊन गेले. याचवेळी त्यांच्या नाकातून रक्तप्रवाह सुरू झाला. त्यांना जबरदस्तीने उचलून नेताना हा रक्त प्रवाह सुरू झाल्याचे दिसून आले, ते बसण्याचे तयारीत होते पण त्यांना बसू दिले नाही सरळ उचलून घेऊन गेले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, गुंडागर्दी नही चलेगी, छात्रोंको न्याय दो, पंतप्रधान इस्तीफा दो अशा घोषणा देण्यात आल्या. लोकसभा सदस्य चरणजीत सिंह चन्नी , सुखविंदर सिंह रंधवा, शशिकांत सेंथिल इत्यादी नेत्यांना विद्यार्थी आंदोलनात समर्थणार्थ अटक करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg