loader
Breaking News
Breaking News
Foto

दुर्गवीर प्रतिष्ठानकडून देवरुख पर्शरामवाडी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवरुख पर्शरामवाडी येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या 43 विद्यार्थ्यांना दुर्गवीर प्रतिष्ठान यांचे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. शाळेच्या मागणीनुसार यावर्षी दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तरे, कंपासपेटी, रंगपेटी, वह्या, चित्रकला वह्या इत्यादी साहित्याचा समावेश होता. या उपक्रमामुळे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाटप कार्यक्रमाला दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहीत बालदे (रत्नागिरी जिल्हा प्रमुख) स्वप्निल पाडावे (चिपळूण तालुका समन्वयक) राजेश चव्हाण, सदस्य प्रशांत राजाराम डिंगणकर (संचालक सदस्य, उपखजिनदार महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी जिल्हा समन्वयक, गड संवर्धन समिती प्रमुख) ओवी बालदे, संस्कृती पाडावे, प्रांजल प्रशांत डिंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय राघो परशराम, शिक्षण तज्ञ सदस्य संतोष अडवल, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना कांबळे, संजीवनी जाधव तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याबद्दल शाळेच्या वतीने दुर्गवीर प्रतिष्ठानचे आभार मानण्यात आले असून संस्थेच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg