loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली सारंग मार्गावरील कोंडीजवळ खोल दरीकडील रस्ता ढासळला

दापोली (प्रतिनिधी) - दापोली सारंग मार्गावरील कोंडीजवळ ढासळलेल्या रस्त्याची वेळीच सुधारणा केली गेली नसल्यामुळे यावर्षी सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने रस्त्याची बाजू ढासळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठी धोक्याची झाली आहे. दापोली मुख्यालयाच्या ठिकाणाहून सारंग कळंबट वाघवे म्हैसोंडे अडखळकडे जाणारा मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. असा हा मार्ग कोंडी नावाच्या ठिकाणाजवळ एका साईटने गेल्या पावसाळ्यात ढासळला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीत सध्या मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. या बरसणार्‍या पावसाने सगळीकडेच पाणी केले आहे. त्यामुळे जमिनही भुसभुशीत झाली आहे. तर वेळीच रस्त्यांची सुधारणा केली जात नसल्याने रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे पडलेले आहेत अशा या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे गढुळ पाणी साचून राहत असल्याने रस्त्यातील खड्ड्यांच्या खोलीची नेमकी व्याप्तीच समजून येत नसल्याने आधीच या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील कोंगळे, ताडील, बांधतिवरे, साकुर्डे, वेळवी, दहेण, भोमडी, मांदिवली आदी अनेक गावांकडे या मार्गावरुन जा ये करणारी वाहतूक धोक्याची झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg